S M L

तुकाराम ओंबळेंचा हल्लेखोर कसाबच - भास्कर कदम

8 मे, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांच्यावर कसाबनेच हल्ला केला होता, अशी साक्ष पोलीस सबइन्स्पेक्टर भास्कर कदम यांनी दिली. त्यावेळी ' स्कोडा गाडीतून अबू ईस्माइलच्या सोबत असलेला दुसरा आरोपी कसाबच होता, असंही साक्ष देताना भास्कर कदम ठामपणे म्हणाले. पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू आणि कसाबची अटक यावरची साक्ष आज आर्थररोड तुरुंगातल्या स्पेशल कोर्टात झाली. 26/11च्या खटल्याच्या सुनावणीतली ती पाहिलीच साक्ष होती. 26/11 मुंबई हल्ल्यांच्या केसमध्ये कसाबवर ठेवण्यात आलेल्या 86 आरोपांपैकी गिरगाव चौपाटीवर पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतची आज पहिली साक्ष नोंद करण्यात आली. त्यावेळी साक्ष देताना, ' मेट्रो सिनेमा जंक्शनवर फायरिंग केल्यानंतर कसाब आणि ईस्माइल स्कोडा गाडीतून गिरगांव चौपाटीच्या दिशेनं पळाले असताना भडकमकर मार्ग पोलिसांनी कसाबला अडवलं. त्यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला. कसाबच्या बंदुकीची गोळी लागून तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला.' असं भास्कर कदम म्हणाले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. सबइन्स्पेक्टर भास्कर कदम यांच्या साक्षीआधी ओंबळेंच्या मृत्यूचा पंचनामा आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट कसाबचे वकील अब्बास काजमी यांना देण्यात आला. त्यावर ही कागदपत्र आपल्याला मान्य नसल्याचं काजमी यांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टानं काजमी यांना वेळकाढूपणा थांबवण्यास सांगितलं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना सबइन्स्पेक्टर भास्कर कदम यांची साक्ष नोंदवण्याची कारवाई सुरू करण्यास सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 06:00 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close