S M L

छोटे नवाबांची पद्मश्री काढून घेणार?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 7, 2014 02:30 PM IST

छोटे नवाबांची पद्मश्री काढून घेणार?

07 ऑगस्ट :  बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खानला मिळालेला 'पद्मश्री' पुरस्कार काढून घेतला जाण्याची घेण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालय विचारात. न्यायालयात सैफविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात त्याच्यावरचे आरोप निश्चित करण्यात आल्याने सरकार या मुद्याचा विचार करत आहे. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सैफला 2010 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते. कलाक्षेत्रात मोलाच्या योगदानाबद्दल 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सैफला 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये सैफ आणि त्याच्या दोन मित्रांनी मारहाण केल्याचे आरोप सिद्ध झालेले आहेत. त्यामुळे त्याला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्रालयात तक्रार दाखल करून सैफचा सन्मान काढून घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, सैफला 'पद्म' पुरस्कार जाहीर झाल्यावरही या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. एवढा मोठा पुरस्कार देण्याइतपत सैफचे या क्षेत्रात योगदान काय? असा प्रश्नही विचारण्यात आला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close