S M L

जागावाटपाचा तिढा, अजित पवार दिल्लीला रवाना

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2014 04:34 PM IST

जागावाटपाचा तिढा, अजित पवार दिल्लीला रवाना

pawar_delhi07 ऑगस्ट : आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीची चर्चा करणार आहेत.

काल बुधवारी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली होती, त्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच चढाओढ सुरू झालीये. राष्ट्रवादीनं 144 जागांसाठी आग्रह धरलाय.

मात्र, राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबरच असेल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांनी मुंबईत सकाळी आपला जनता दरबार आटोपून दिल्लीला रवाना झाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close