S M L

अशोक चव्हाणांची 'आदर्श' सुटका, खटला चालवण्यास कोर्टाची स्थगिती

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2014 08:53 PM IST

asokh chavan  free07 ऑगस्ट : आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा मिळालाय. आदर्श प्रकरणातून अशोक चव्हाणांची 'कोर्टाच्या पायरी'तून सुटका झालीये. चव्हाणांवर सेशन्स कोर्टात खटला चालवायला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

आदर्श घोटाळा खटल्यातून चव्हाणांचं नाव वगळण्यात यावं या मागणीसाठी सीबीआयने याचिका केली होती. मात्र चव्हाणांविरुद्ध खटला चालवायला राज्यपालांची परवानगी लागत असते. पण राज्यपालांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती. त्यावर सेशन्स कोर्टाने आक्षेप घेतला होता.

त्याविरोधात सीबीआयने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. सीआरपीसीच्या तरतुदीनुसार आणि राज्यपालांची परवानगी नसल्याने सीबीआयला आदर्श खटल्यातून नाव वगळायचं आहे. याबाबत कायदेशीर तरतुदीच्या आधारावर सीबीआयच्या वकिलाने केलेला युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केला.

आदर्श प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये अशोक चव्हाण यांचंही नाव आहे. पण अशोक चव्हाणांवर आरोपपत्र दाखल करण्यास राज्यपालांनी परवानगी दिलेली नाही. अखेर या प्रकरणावर आज सुनावणी झाली त्यावर हायकोर्टाने चव्हाण यांच्यावर खटला चालवण्यास स्थगिती दिली आहे. एकाप्रकारे अशोक चव्हाणांची पुन्हा एकदा आदर्श सुटका झालीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close