S M L

'चला, उठा महाराष्ट्र घडवूया', सेनेचं 'व्हिजन' डॉक्युमेंट सादर

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2014 10:56 PM IST

'चला, उठा महाराष्ट्र घडवूया', सेनेचं 'व्हिजन' डॉक्युमेंट सादर

07 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. लोकसभेत दमदार यश मिळवल्यानंतर शिवसेनेनं विधानसभेसाठी आता कंबर कसली आहे. मनसेच्या 'बहुचर्चित' ब्लू प्रिंटच्या अगोदर बाजी मारत सेनेनं आज (गुरुवारी) 'व्हिजन डॉक्युमेंट' सादर केली आहे. 'चला, उठा महाराष्ट्र घडवूया', या संकल्पनेखाली व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यात आलंय.

मुंबई पहिला मान देत योजनाचा आराखडा तयार करण्यात आलाय. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार अशी घोषणा उद्धव यांनी केली. तसंच गेल्या वर्षभरापासून रखडलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, मागासवर्गियांसाठी वाढीव तरतूद असं निवडणुकीचं जोरदार पॅकेज यात आखण्यात आलंय. आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंट सादर केली.

विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी 12 जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकार्‍यांशी उद्धव यांनी एकाच वेळी संवाद साधला. यासाठी अगोदरच शिवसेनेनं 12 जिल्ह्यात व्हिडिओ कॉन्फरन्स सेंटर स्थापन केलं आहे. आता या डॉक्युमेंटवर महायुतीतल्या इतर घटक पक्षांच्यांही सूचना मागवणार आहे आणि त्यानंतर सर्वांचा विचार घेऊन वचननामा तयार करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

कसं आहे शिवसेनेचं व्हिजन डॉक्युमेंट ?

मुंबईसाठी योजना

 • - पूर्व किनार्‍यावर कोस्टल रोड
 • - रेसकोर्सच्या जागी उद्यान
 • - मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण
 • - र्व्हच्युअल क्लासरूम ही संकल्पना राज्यभर राबवणार
 • - मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणार
 • - मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक करणार
 • - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

ग्रामीण महाराष्ट्रासाठी योजना

 • - ग्रामीण महाराष्ट्राचा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विकास
 • - उद्योगांना महाराष्ट्रातच थांबवणार
 • - सेझचा शेतकर्‍यांच्या हितासाठी वापर
 • - नागरिकांसाठी सुविधा केंद्र
 • - बेरोजगारांसाठी झुणका भाकरच्या धर्तीवर नवी योजना
 • - कोरडवाहू शेतीसाठी वेगळं धोरण
 • - किमान 12 तास कृषीपंपांना अखंड वीजपुरवठा
 • - नुकसानभरपाईसाठीचा अन्यायकारक आणेवारी कायदा बदलणार
 • - माती परीक्षण प्रयोगशाळा

 शिक्षण

 • - शिक्षणाचा दर्जा सुधारणार
 • - शिक्षण हक्क कायद्याचा तंतोतंत अंमलबजावणी
 • - प्रत्येक शाळेत विद्यार्थी
 • - विद्यार्थिनीसाठी स्वच्छतागृहं

आरोग्य

 • - आरोग्य विम्याची मर्यादा 2 लाखांपर्यंत
 • - अर्भक मृत्यूदर घटवणार
 • - स्त्रीभ्रूणहत्या टाळणार
 • - ग्रामीण भागात साप्ताहिक आरोग्य शिबीर
 • - नागपूरमध्ये अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल

 

मागासवर्गियांसाठी वाढीव आर्थिक तरतूद

 • - महिला सक्षमीकरणावर भर देणार
 • - शिवरायांच्या जीवनावर आधारित संग्रालय आणि शो
 • - संत विद्यापीठाची स्थापना
 • - पंजाबमधल्या घुमानमध्ये नामदेवांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा

 

इतर

 • - अमरावतीला ऍग्रिकल्चरल हब करणार
 • - नागपूरला ट्रान्सपोर्ट हब करणार
 • - पुण्याला एज्युकेशनल हब करणार
 • - सोलापूरला टेक्स्टाईल हब करणार

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2014 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close