S M L

फ्राय डे रिलीज : ट्रीट तीन सिनेमांची

8 मेयंदा फ्राय डे रिलीजमध्ये एक मराठी, एक हिंदी आणि एक इंग्लिश अशा तीन सिनेमांची ट्रीट वीकेण्ड एन्जॉयमेण्टसाठी सज्ज आहे. झक मारली बायको केलीसध्या मराठी सिनेमांची चलती आहे. चांगले विषय दमदार स्टार कास्ट तर असतेच पण सोबतीला असतं प्रगत तंत्रज्ञान आणि ग्रँड इव्हेण्ट. नुकतंच मुंबईत 'झक मारली बायको केली' या सिनेमाचं प्रिमिअर मोठ्या जल्लोषात पार पडंलं. मैने प्यार किया या सिनेमातून पदार्पण करत प्रेक्षकांची मनं जिंकलेली भाग्यश्री पटवर्धन आता तब्बल 20 वर्षांनंतर या मराठी सिनेमामधून कम बॅक करतेय. तिच्याबरोबर भरत जाधव, नीलम शिर्के आहेत. निलम आणि भाग्यश्री यांच्यामध्ये होणारी भरतची तारांबळ ही सिनेमाची वन लाइन स्टोरी. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला गोळा करतो हे कळेलच पण भाग्यश्रीच्या कमबॅक मुळे तिचे चाहते मात्र खुश दिसताहेत.नाइन्टी नाइन - '99' मल्टिप्लेक्स आणि निर्माते यांच्यातला वाद संपलेला नसतानाही नाइन्टी नाइन - '99' हा सिनेमा 15 मे ला रिलीज होतोय. सायरस ब्रोचा, बोमन इराणी आणि साध्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीबद्दलही चर्चेत असणारा कुणाल खेमू आणि सोहा अली खान अशी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. सिनेमाचं दिग्दर्शन केलंय डी के कृष्णा आणि राज निदीमोरू यांनी. सिनेमात महेश मांजरेकर आणि विनोद खन्ना खास भूमिकेत आहेत. आता हा नाइन्टी नाइन - '99' सिनेमा सेंच्युरी ठोकतोय का ते पाहयचं.थ्री टेन टू युमाबॉलिवुड आणि मराठी सिनेमाबरोबरच हॉलिवुड सिनेमाही रिलीज होतोय. 'थ्री टेन टू युमा' हा सिनेमा दिग्दर्शित केलाय जेम्स मॅनगोल्डनं. बेन वेडचा आपल्या जमिनीसाठीचा झगडा सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे यात आहेत. रुसेल क्रो, ख्रिश्चन बेल, लोगन लर्मन यांच्या यामध्ये लक्ष्यवेधी भूमिका आहेत. यावेळी ऑस्करसाठी या सिनेमाला दोन नॉमिनेशन्स मिळाली होती.तर या वीकेण्डला कुठला सिनेमा पाहयचा हा चॉइस तुमचा...

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 02:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close