S M L

इराकवर हवाई हल्ला करण्याचे ओबामांचे आदेश

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2014 01:25 PM IST

obama-immigration-108 ऑगस्ट : इराकचं युद्ध आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. इराकमध्ये सुरू असलेल्या यादवीमध्ये आता अमेरिकेनंही उडी घेतली आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या इराकच्या भागावर हवाई हल्ला करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहेत अशी माहिती 'सीएनएन'नं दिली आहे.

दहशतवादी अर्बिल कर्दिस्तानच्या दिशेने कूच करत असल्याने तिथल्या अमेरिकी नागरिकांच्या बचावासाठी हल्ल्याची गरज असल्याचं ओबामा यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये आयएसआयएस ही दहशतवादी संघटना उत्तर इराकच्या कर्दिस्तानच्या राजधानीपर्यंत पोहचली आहे.

यामुळे लाखो ख्रिश्चन नागरिक बेघर झाले आहेत. सोबतच याझिदी जमातीचे जवळपास 50 हजार लोकंही अडकलेले आहेत. यासगळ्यांना अन्न-पाणी मिळायलाही अडचण होतेय.

2011 च्या अखेरीस अमेरिकेने आपलं इराकमध्ये असलेलं सैन्य परत बोलावलं होतं. त्यानंतर 3 वर्षांतला अमेरिकेचा हा पहिला हल्ला आहे. अमेरिकेचे नागरिक आणि हजारो निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात आलेले असताना अमेरिका कारवाई करणारच असं ओबामा यांनी म्हटलंय. मात्र, गेल्या वेळप्रमाणे अमेरिकी सैन्य प्रत्यक्ष इराकी जमिनीवर उतरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इस्लामिक दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या भागातल्या नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे विमानातून टाकण्यात येणार आहेत.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी अरबिल आणि कुर्दिस्तान भागात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक आहेत. इराकमधल्या भारतीयांसाठी आम्ही काही महिन्यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना इराक सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2014 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close