S M L

नातेवाईक नाही, निवडून येण्याची क्षमता असणार्‍यालाच उमेदवारी - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2014 02:10 PM IST

565cm_maharashtra

09 ऑगस्ट : काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त नेत्यांच्या नातेवाईकांना नाही तर निवडून येण्याची क्षमता असणार्‍याला उमेदवारी दिली जाईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितलं.

ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्ताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोण कोणाचा नातेवाईक आहे यापेक्षा जो सक्षम उमेदवार आहे, जो निवडून येईल आणि काँग्रेसची विचारधारा जोपासेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल असं म्हणत चव्हाणांनी राणेंना टोला लगावलाय. राज्यातील अनेक नेते आपल्या नातेवाईकांसाठी उमेदवारी मागत आहे. नारायण राणे यांनीही आपला मुलगा कणकवलीतून आणि आपण कुडाळमधून निवडणूक लढवू असे जवळपास जाहीरच केले आहे. त्याचा संदर्भ घेत पत्रकारांनी चव्हाणांना प्रश्न विचारला असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होणार आहे मात्र जागावटपाचा विषय हा काही काँफरन्समध्ये होत नाही. त्यावर बैठकीत निर्णय होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसचं मराठा आरक्षणाबाबत कोर्टात मिळालेल्या आव्हानाला आम्ही सामोरे जात आहोत. एका दिवसात याचा लाभ मिळणार नाही. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल असंही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close