S M L

'इबोला'व्हायरस नेमका आहे तरी काय?

Sachin Salve | Updated On: Aug 9, 2014 11:09 PM IST

'इबोला'व्हायरस नेमका आहे तरी काय?

09 ऑगस्ट : 'इबोला' नावाच्या व्हायरसमुळे जगाला धास्ती भरली आहे. धक्कादायक म्हणजे या व्हायरसवर कोणतही औषध किंवा लस उपलब्ध नाहीये. त्यामुळे जगभरात याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. इबोलाची साथ मार्च महिन्यात गिनीमध्ये सुरू झाली. त्यानंतर सिएरा लिऑन आणि लायबेरियामध्ये ही साथ पसरली. आतापर्यंत या साथीमुळे 1000 लोकांचा मृत्यू झालाय.

या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. इबोला हा एका प्रकारचा विषाणू आहे. जो शरीरात रक्त संचालन प्रणालीवर आघात करतो. इबोला शरीरात दाखल झाल्यानंतर बाधीत व्यक्तीच्या अंगावर पुरळ येण्यास सुरुवात होते. डोळे, तोंड येणं ही याची प्राथमिक लक्षण आहे. इबोलाचा प्रभाव वाढल्यानंतर नाका-तोंडातून रक्त येतं. हा प्रकार पुढे इतका वाढत जातो की यामुळे बाधीत व्यक्तीचा मृत्यू होतो.

इबोला हा संसर्गजन्य विषाणु असून त्याचा संसर्ग हा रक्तातून, लैंगिक संबधामुळे घामातून, थुंकीतून पसरू शकतो. भारताला या व्हायरसचा धोका नाहीये पण खबरदारी म्हणून दिल्लीत आज 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच विमानतळांवर तपासणीही केली जाणार आहे. परंतु या साथीबाबत हेही जाणून घ्या...

 इबोला काय आहे ?

 • - जनावरांमार्फत माणसांना इबोलाचा संसर्ग होतो
 • - जनावरांचं रक्त, मांस, मलमूत्र इ.चा माणसाशी संपर्क आला तर इबोलाच्या संसर्गाची शक्यता वाढते
 • - तसंच ज्या व्यक्तीचा इबोलानं मृत्यू झालाय त्याच्या रक्ताशी संपर्क आल्यास इबोलाचा संसर्ग होतो

लक्षणं

 • - ताप, नाका-तोंडातून रक्त येणं
 • - लगेचच स्कीन इन्फेक्शन होणं
 • - अंगावर पुरळ येणं
 • - डोळे येणं, तोंड येणं
 • - जननेंदि्रयांवर सूज येणं

काय काळजी घ्यावी ?

 • - प्राथमिक स्वच्छता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे
 • - विशेष करुन मांसाहारी लोकांनी स्वच्छता बाळगणं आवश्यक आहे
 • - स्वच्छ ठिकाणांहून मांस खरेदी करावं
 • - मांस नीट शिजवावं
 • - दुखापत झालेल्या प्राण्यांचं मांस खाऊ नये
 • - स्वच्छ पाणी प्यावं
 • - बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे
 • - जेवणा आधी हात साबणाने स्वच्छ धुवावे
 • - केर-कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट लावा.
 • - कुरतडणारे प्राणी हा विषाणु पसरवू शकतात

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2014 11:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close