S M L

इराणमध्ये विमान कोसळलं, 40 प्रवासी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 10, 2014 07:00 PM IST

इराणमध्ये विमान कोसळलं, 40 प्रवासी ठार

10 ऑगस्ट : इराणची राजधानी तेहरानमध्ये सिपाहन एअरलाईन्सचं विमान कोसळून 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मेहराबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही वेळातच हा अपघात झाला. विमानाच्या इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हे विमान पूर्व इराणमधल्या ताबास शहराकडे जात होतं.

इराणमध्ये गेल्या काही दिवसांत विमान कोसळण्याच्या अनेक घटनामध्ये वाढ होत आहे. जुनी विमानं आणि पुरेशी देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे हे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इराणकडे जी अमेरिकन आणि युरोपिअन बनावटीची विमानं आहेत, त्याचे स्पेअर पार्ट्स इराणला मिळत नाहीत. याचं कारण म्हणजे गेली काही वर्षं अमेरिकेनं इराणवर निर्बंध घातलेत. अनेक विमानं सोव्हिएत काळातली असून त्यांचे स्पेअर पार्ट्स मिळणंही कठीण झालं आहे. त्यामुळे विमानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे, हे यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2014 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close