S M L

पुणेकर रिक्षाचालकांवर नाराज

8 मे, पुणे पुण्यात सहा दिवस चाललेला रिक्षांचा संप अखेर मिटूनही भाडं आणि वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघालेला नाहीये. वाटाघाटींमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं पुण्यातल्या नागरिक संघटनांचं म्हणणं आहे. याविरोधात नागरी संघटना कोर्टात जाण्याच्याही तयारीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून भाडे कपातीविरोधात पुण्यातील रिक्षा संघटना संपावर गेल्या. उपोषणाचं हत्यारही उपसण्यात आलं. पण आपल्या निर्णयावर विभागीय आयुक्त दिलीप बंड ठाम राहीले. पालक मंत्री अजित पवारांपर्यंत धाव घेतल्यानंतर रिक्षा संघटनांना फक्त पहिल्या किलोमीटरचा एक रुपया वाढवून मिळाला. सहा दिवसांच्या संघर्षांतून मिळालेलं हे यश. नेते खुश असले तरी सामान्य रिक्षा चालक मात्र या राजकारणात होरपळला आहे. ' कोणताही चालक किंवा संघटनेला यातून फायदा झाला नाही, असं ताराचंद भोईटेंसारख्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. आम्हाला सहा दिवसांच्या संपातून काहीच मिळालेलं नाहीये. संप न करताही हे आम्हाला मिळालं असतं. आम्ही तोट्यात आहोत, असं रिक्षा चालक नवीन पटेल यांनी सांगितलं.राज्यातल्या इतर शहरांमध्ये फेब्रुवारीतच रिक्षा भाडे कमी झालंय. पुण्यात ते मे महिन्यात कमी झालं. पण पहिल्या किलोमीटरला पूर्वी इतकंच भाडं पुणेकरांना मोजावं लागणार आहे. संपावर हा तोडगा काढताना यात सामान्य पुणेकरांना विश्वासात घेतलं गेलं नाही. या विरोधात नागरी संघटना मात्र न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत. यावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी " या निर्णयात नागरिकांना विश्वासातच घेतलं नाही, हा मोठा गुन्हा आहे. संघटीत क्षेत्राने केलेली ही कुरघोडीच आहे. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असं मत व्यक्त केलं आहे. या सहा दिवसांच्या काळात शहरात पीएमपीनं जादा बसेस सोडल्या. त्याचा फायदा नागिरकांनी घेतला.सहा दिवसांच्या संपामुळे पुणेकरांचं अतोनात नुकसान झालं आहे. पण दुसरीकडे पीएमपीच्या बससेवेला उदंड प्रतिसाद मिळाला. यावरून पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती तकलादू आहे हे स्पष्ट झालं आहे.असं असलं तरी रिक्षा चालक संघटना भाड्याबाबत राज्यव्यापी संपाची तयारी करताहेत. तर नागरी संघटना न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे. मात्र सहा दिवसांच्या काळात भरडला गेला तो सामान्य पुणेकर. त्याचा विचार मात्र कोणीही केला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 05:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close