S M L

गोविंदापथकांच्या बालहट्टावर पाणी, 18 वर्षाखालील गोविंदांना बंदी

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2014 09:07 PM IST

गोविंदापथकांच्या बालहट्टावर पाणी, 18 वर्षाखालील गोविंदांना बंदी

11 ऑगस्ट : दहिहंडीत गोविंदा पथकांच्या बालहट्टावर हायकोर्टाने पाणी फेरले आहे. 18 वर्षाखालच्या मुलांचा दहिहंडीत सहभाग नसावा असं शब्दात मुंबई हायकोर्टाने गोविंदा पथकांना बजावले आहे. 20 फुटांपर्यत दहीहंडीचे थर लावण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी राज्य सरकारने हायकोर्टात केली होती. दहीहंडीसंदर्भात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली.

याबद्दल राज्य सरकारने आज हायकोर्टात निवेदन सादर केलं. यावर हायकोर्टाने राज्यसरकारची बाजू घेत गोविंदा पथकांना सुनावले. आता दहीहंडीसंदर्भात राज्य सरकार परिपत्रक काढणार आहे. कोणत्या कायद्यांनुसार कारवाई करणार हे परिपत्रकात नमूद करा आणि काँक्रिटच्या रस्त्यांवर दहीहंडीस परवानगी देऊ नका अशी सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत. तसंच जमिनीवर गादी अंथरुन त्यावर थर लावावेत असा खबरदारीचा सल्लाही हायकोर्टाने राज्य सरकारला दिलाय.

तसंच बालगोविंदांच्या सहभागावरही पोलीस करडी नजर ठेवणार आहे. या अगोदर हायकोर्टाने बालगोविंदांना म्हणजे 12 वर्षांखालच्या गोविंदांना थरावर चढायला मनाई केली होती. पण तरीही गोविंदा पथकांना हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. दोन दिवसांपूर्वी दहिहंडी सरावादरम्यान नवी मुंबईत किरण तळेकरी या बालगोविंदाचा थरावरुन पडून मृत्यू झाला तर आज जोगेश्वरीमध्ये ह्रषिकेश पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेत थरारचा थरारातून बालगोविंदांची सुटका केलीय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close