S M L

विधान परिषदेसाठी तटकरे-मोहन जोशी रिंगणात

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2014 06:20 PM IST

विधान परिषदेसाठी तटकरे-मोहन जोशी रिंगणात

11 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषद पोटनिवडणुकीचा आखाडा आता चांगलाच रंगलाय. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने आली आहेत. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रिंगणात आहेत. तटकरे यांनी आज आपला अर्ज भरला असून अधिकृतरित्या मैदानात उतरले आहे.

तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांनीसुद्धा अर्ज भरल्यानं चुरस निर्माण झालीय. शिवसेना कुणालाही उमेदवारी देणार नाहीये. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या रिकाम्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही आपलाच उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close