S M L

भाजपकडून दिल्लीचे दार बंद, जागावाटपाचे अधिकार आता शिलेदारांकडे ?

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2014 06:39 PM IST

fadanvis_udhav_thackarey11 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाची चर्चा मुंबईतच होणार असल्याचे संकेत भाजप अध्यक्ष अमित शाहांनी दिले आहेत. शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा हा एक भाग असल्याचं बोललं जातंय.

शाह यांच्या या निर्णयामुळे राज्यातील भाजप नेते जास्त जागांसाठी आक्रमक झाले आहेत. राज्यातील नेत्यांना जागावाटपाबाबतचे सगळे अधिकार दिल्याची माहिती आहे. यापूर्वी सेना-भाजपमधल्या जागावाटपाबाबत केंद्रीय स्तरावरच्या नेत्यांशीच चर्चा करणार असल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

पण आता जागावाटपाबद्दलचे सगळे अधिकार हे राज्यातील नेत्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी आता देवेंद्र फडणवीस किंवा विनोद तावडे यांच्याशीच सेनेला बोलवणी करावी लागणार आहे. अलीकडेच शिवसेना आणि भाजपची जागावाटपासाठी बैठक पार पडली पण यात कोणताही तोडगा निघाला नाही.

यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबतही बैठक झाली पण आश्वासनावरच तोडपाणी करण्यात आली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या परिषदेत अमित शाह यांनी महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला होता. आता भाजपने अधिक आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close