S M L

मुख्यमंत्री कोट्यातून घरं लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करा : कोर्ट

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2014 07:56 PM IST

dg55mumbai_High-Court11 ऑगस्ट : मुख्यमंत्री कोट्यातून खोटी माहिती देऊन फ्लॅट घेणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला नसल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्याची सूचनाही हायकोर्टाने केली आहे.

या प्रकरणावर 26 ऑगस्टला अंतिम निकाल देण्यात येणार आहे. त्यावेळी या मुख्यमंत्री कोट्यातील गैरप्रकाराबाबत कशा प्रकारे आणि किती वेळात कारवाई करावी याबाबतची  मार्गदर्शक तत्त्वं हायकोर्ट सरकारला देणार आहे.

मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट मिळवलेले मंत्री, आमदार, पत्रकार, कलाकार यामुळे अडचणीत आले आहेत.या अगोदर मे महिन्यात मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट्स घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई करा असे आदेश हायकोर्टाने दिले होते.

या फ्लॅटवाटपातल्या गैरप्रकारांबद्दल सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केलीय. मुंबईत सुमारे 200 ते 250 फ्लॅट राजकारण्यांनी लाटले आहेत. तर राज्यभरात अशा लाभाथीर्ंची संख्या 700 च्या घरात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close