S M L

निवडणूक हरलो तर राजकारण सोडेन -आर.आर.पाटील

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2014 08:10 PM IST

rrpatil_ncp11 ऑगस्ट : सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तोफ डागलीये. विधानसभा निवडणूक हरलो, तर मी राजकारण सोडेल, पण मी बहुमतानं निवडून आलो तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, असं थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलंय.

सांगलीमध्ये आज (सोमवारी) राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा झाला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ले चढवले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे घराण्यांवर निशाणा साधला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व करू शकतात काय? त्यांनी कोणती संस्था काढली आहे का ? मुंबई महानगरपालिकेची तर वाट लावली अशी जळजळीत टीका अजित पवारांनी केली. तसंच शिवसेनेच्या खासदारांना कशाची मस्ती आली आहे. रोजा असताना मुस्लिम बांधवाला चपाती कशी भरवता असा संतप्त सवालही उपस्थित केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2014 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close