S M L

आघाडीत बिघाडी ; 'उमेदवारी मागे घ्या, नाहीतर आघाडी तोडा'

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2014 01:29 PM IST

tatkare_joshi12 ऑगस्ट :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषद निवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येतंय. उमेदवारी मागे घ्या, नाहीतर आघाडी तोडा असा अप्रत्यक्ष इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिला आहे.

खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला होता. त्या रिकाम्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांनी अर्ज भरल्यानं चुरस निर्माण झालीय.

मात्र शिवसेना कुणालाही उमेदवारी देणार नाहीये. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या रिकाम्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही आपलाच उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय. एकीकडे आघाडीचा धर्म पाळा असा सूर दोन्ही पक्षांकडून लगावला जात आहे पण विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

 विधानसभेतली स्थिती एकूण जागा - 288 1 (अँग्लो इंडियन)

- राजीनामा दिलेले आमदार - 10

- अपात्र आमदार - 02

- एकूण मतदार - 276

- निवडून येण्यासाठी लागणारी मतं - 138

विधानसभा पक्षीय बलाबल

 • - काँग्रेस - 80
 • - राष्ट्रवादी काँग्रेस - 61
 • - भाजप - 44
 • - शिवसेना - 43
 • - मनसे - 12
 • - शेकाप - 4
 • - समाजवादी - 03
 • - जनसुराज्य - 02
 • - अपक्ष - 24
 • - बहुजन विकास आघाडी - 01
 • - भारिप - 01
 • - डावे - 01
 • - लोकसंग्राम - 01
 • - स्वाभिमानी पक्ष - 01

 राजीनामा दिलेले आमदार

 • - लक्ष्मण जगताप
 • - नाना पटोले
 • - अशोक चव्हाण
 • - राजीव सातव
 • - संजय जाधव
 • - चिंतामण वनगा
 • - राजन विचारे
 • - गोपाळ शेट्टी
 • - दीपक केसरकर
 • - सुनील तटकरे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2014 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close