S M L

सुनील पारसकरांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2014 10:46 PM IST

सुनील पारसकरांना दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

12 ऑगस्ट : मॉडेल बलात्कार आणि विनयभंग आरोप प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आलाय. सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप केला होता.

याप्रकरणी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पारसकर यांनी मुंबई सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी पारसकर यांच्या वकिलांनी अनेक मुद्दे मांडले. या मॉडेलनं साडेसात महिन्यानंतर तक्रार केली होती.

मॉडेल ही ओळखीची होती आणि मैत्रीण होती या दोघांचाही एकमेकांशी चांगला संपर्क होता. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता पारसकरांना अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. जामीनअर्ज मंजूर झाल्यानंतर पारसकरांनी माध्यमांशी बातचीत केली. आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून खरं सत्यसमोर येईल असा विश्वास पारसकर यांनी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2014 10:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close