S M L

चंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्रात बिघाड : 710 मेगावॅट वीज निर्मिती बंद

11 मेचंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्रात बिघाड झाल्यामुळे सध्या 710 मेगावॅट वीज निर्मिती बंद झाली आहे. या केंद्रातले कोळसा वाहण्याचे तीन कन्व्हेयर बेल्ट शॉर्ट सर्किटमुळे तुटल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबारोबर युनिट सातमध्ये ट्युब गळतीही सुरु झाल्यामुळे पाचशे मेगावॅट वीजनिर्मिती सध्या बंद आहे. तर चार नंबरचं युनिट गेल्या पंधरा दिवसांपासून वार्षिक दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. या युनिटमधून 210 मेगावॅट वीज निर्मीती होते. एकूण 710 मेगावॅटची तुट झाल्यामुळे विदर्भातल्या काही भागांमध्ये लोडशेंडिंग वाढण्याची शक्याता आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सध्या या संचांच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2009 09:35 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close