S M L

आरक्षणावर तोडगा,तिसरी सूची तयार करणार !

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2014 09:07 PM IST

आरक्षणावर तोडगा,तिसरी सूची तयार करणार !

13 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणांचा धडाका लावला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणावरुन रण पेटले. त्यांच्यापाठोपाठ इतरही समाजांनी आरक्षणाची मागणी सुरू केलीय. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर आता राज्य सरकारने मधला मार्ग काढला आहे.

धनगर आणि इतर समाजांसाठी तिसरी सूची करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच ज्या-ज्या जातींनी आरक्षण मागितलंय त्याबाबत कायदेशीर बाजू तपासून केंद्र सरकारला शिफारस करू अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सह्याद्री'वर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तर लिंगायत समाजाच्या मागणीसाठी दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलीय या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा झाली.

तसंच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी नाराजी व्यक्त केली.

तिसरी सूची म्हणजे काय ?

आदिवासीबाह्य आरक्षण

- पहिली सूची - अनुसूचित जाती

- दुसरी सूची - अनुसूचित जमाती

- तिसरी सूची - आता ज्या जाती मागण्या करतायत त्यांना या सूचित टाकणार

तिसरी सूची

या सर्व जातींना तिसर्‍या सूचीमध्ये टाकण्याविषयी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार आहे. कारण तसे अधिकार राज्याला नसून केंद्राला आहेत. केंद्र सरकार घटनादुरूस्ती करून या जातींचा समावेश तिसर्‍या सूचित करू शकते.

123 तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर

त्याशिवाय मंत्रिमंडळ बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय झाले. सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या 123 तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर झालीय. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार आहे. शेतकर्‍यांचाही शेतसाराही माफ करण्यात येणार आहे. तसंच एलबीटीच्या वादावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. एलबीटी किंवा जकात यापैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार महापालिकांना दिला जाणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close