S M L

वरूणराजा धाव रे; मराठवाड्यात 4 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2014 09:20 PM IST

farmer suicide13 ऑगस्ट : राज्य सरकारने 123 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचं जाहीर केलंय. पण गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात 4 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. हिंगोली जिल्ह्यात चिखलागर तांडा इथं गेल्या दोन दिवसांत दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

हरी श्यामराव राठोड असं एका शेतकर्‍याचं नाव आहे. राठोड यांनी सततच्या नापीकीमुळे आणि शेतातल्या दुबारपेरणी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतातील एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच 50 वर्षीय अंकुश चांदू चव्हाण यांनी शेतातल सर्व पिके वाया गेली, दुबार पेरणी तसंच मुलीचे लग्न डोळ्यासमोर असल्याने कर्ज फेडणे अशक्य असल्याच्या कारणाने विष घेऊन आत्महत्या केली. दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळल्यामुळे दोन्ही कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.

सेनगाव तालुक्यात अल्प पावसाचे प्रमाण असून चिखलागर तांडा येथे सुद्धा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे कसेबसे या शेतकर्‍यांनी एकदाची पेरणी केली होती; परंतु प्रचंड पाण्याचा दुष्काळ व त्यातून होणारी हेळसांड, हातचे सोयाबीन पीक गेल्याने आता कर्ज फेडणे अशक्य असल्याने या शेतकर्‍यांनी  आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेले शेतकरी हरी श्यामराव राठोड यांना जेमतेम दोन ते अडीच एकर जमीन असून ती कोरडवाहू आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना ही घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले व 3 मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

दुसरे शेतकरी अंकुश चांदू चव्हाण यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दोन मुले, तीन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्याकडे सुद्धा दोन एकर खरबाळ जमीन असून ती पाण्याअभावी नापीक झाली आहे. यातूनच या दोन्ही शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.

परभणीत 2 शेतकर्‍यांनी केली आत्महत्या 

तर परभणीत पावसाने दडी मारल्यामुळे 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. पावसाळा संपत आला तरीही पाऊस नसल्याने परभणी जिल्ह्यावर भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्याचे खरीपाचे एकूण क्षेत्रफळ 5 लाख हेक्टर एवढे आहे यातील 400 हेक्टरवर शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली तर काहींनी 3 वेळा ही पेरणी केली यात प्रामुख्याने कापूस,सोयाबीन,तूर,मुग ऊस आदी नगदी पिकांची लागवड करण्यात आली.

परंतु पावसाला संपत आला तरीही जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने 90 टक्के पेरण्या वाया जाण्याच्या मार्गावर असून कापूस,सोयाबीन,तुरीची रोपे पाण्याअभावी जळून जात आहे तर ऊस पूर्णपणे वाळून जात आहे. यामुळे पाऊस नाही कर्ज काढून शेतीत केलेला खर्च फेडायचा कसा या विवंचनेतू परभणी जिल्ह्यातील राजभोज कनकुटे आणि कैलास कुर्हे या 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.

परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी ही 774 मिमी पावसाची असून दरवर्षी या सरासरी पेक्षा पाऊस जास्त पडतो या सरासरी नुसार

यावर्षी आजपर्यंत 435 मिमी पाऊस पडतो परंतु यंदा केवळ 132 मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील येलदरी 39 टक्के,लोअर दुधना 29 टक्के या मोठ्या प्रकल्पाबरोबरच 2 मध्यम प्रकल्पात 19 आणि 22 लघु प्रकल्पात 10 टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक राहिल्याने शेतीसाठी तर सोडाच जनावर आणि माणसाच्या पिण्याच्या ही पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पावसाळ्यात जिल्हावासीयांना शोधून पाणी आणण्याची वेळ आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात गारपीट,पावसाळ्यात दुष्काळ अशी विचित्र परिस्थिती केवळ परभणी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यावर यावषच् आली असल्याने शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य जनतेनेही पाणी आणायचे कुठून हा मोठा गंभीर प्रश्न पडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2014 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close