S M L

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2014 09:58 AM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

14  ऑगस्ट :  जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. काल पाकिस्ताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 2 पोलीस अधिकारी शहीद झालेत, तर एका स्थानिकाचाही मृत्यू झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर काल रात्री दहशतवाद्यांनी पोलीस ताफ्यावर हल्ला चढवला. गेल्या पाच दिवसांमधली शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची ही सातवी घटना आहे. सीमा ओलांडून दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये प्रवेश केल्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात पूंछमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल सुरक्षा दलांनी पूंछमध्ये कसून तपासणी केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close