S M L

विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2014 03:51 PM IST

विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम

14 ऑगस्ट :   विधान परीषद निवडणुकीच्या उमेदवारीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तर काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण ही निवडणूक बिनविरोध होऊन आघाडीतला वाद चव्हाट्यावर येऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. त्यासाठी बुधवारी रात्री दहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शरद पवार - पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मॅरेथॉन चर्चा झाली. पण या चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही.

दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असून दोघांनीही उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडकडून मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसला कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे हा तिढा अजूनही कायमच आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडीची चिन्हं दिसू लागली आहे. जागावाटपावरून होणारी वादावादी, विधान परिषदेत विनायक राऊत यांच्या रिकाम्या जागेसाठी दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार आणि नंतर माघार द्यायला दिलेला नकार, या सर्व घटनाक्रमांतून अखेर काँग्रेसने राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close