S M L

8-10 थर लागणार, बालगोविंदांवर बंदी कायम

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2014 01:32 PM IST

8-10 थर लागणार, बालगोविंदांवर बंदी कायम

supreme court and dahi handi

13 ऑगस्ट :   दहीहंडी उत्सव मंडळांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. मुंबई हायकोर्टाने मनोर्‍यांच्या उंचीवर घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मात्र 12 वर्षांखालील गोविंदाना दहीहंडीत सहभागी होण्यास बंदी घातली आहे.

गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीच्या उत्सवात उंच मनोरे रचून लोखो रूपयांची बक्षिसे कमवण्याची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच सराव शिबिरात दोन गोविंदांनी आपला जीव गमावला आहे. याचं पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने 18 वर्षांखालील मुलांना बंदी घातली होती. त्यासोबतचं दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त असू नये असेही आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे दहीहंडी आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती.

गोविंदा पथकांना सुप्रीम कोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. दहीहंडीच्या मनोर्‍यांच्या थरांवरचे निर्बंध सुप्रीम कोर्टानं यावर्षीसाठी उठवलेत.तसंच दहीहंडीत 12 वर्षांवरील मुलांना सहभागी होता येईल,असा दिलासाही सुप्रीम कोर्टानं दिलाय. पण महाराष्ट्राच्या बालहक्क आयोगाच्या नियमानुसार ही दहीहंडी होईल, असंही कोर्टानं सांगितलंय. त्यामुळे 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर हा निर्णय फक्त यावर्षीपुरताच असल्याचंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाचं दहीहंडी पथकांनी स्वागत केलं आहे. मात्र आपण तरीही उंच थर न लावण्याचं आणि जास्त रकमेची बक्षिसेही ठेवणार नसल्याचं ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानचे आयोजक प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close