S M L

काँग्रेसची माघार पण राष्ट्रवादीचा 144 जागांचा 'थर' कोसळला ?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2014 05:46 PM IST

prithviraj and sharad pawar

14 ऑगस्ट : विधान परिषद निवडणुकीवरून आघाडीत बिघाडी आता दूर झाली आहे. काँग्रेसने हात मागे घेतला खरा पण राष्ट्रवादीला 144 जागेचा हट्ट सोडावा लागेल अशी अट घातली आहे. काँग्रेसचे मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झालीय.

विनायक राऊत यांच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होतेय. ही जागा काँग्रेसकडे होती. पण या जागेसाठी सुनील तटकरे यांनीही अर्ज भरला. त्यामुळे आघाडीत तणाव निर्माण झाला. यासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चार तास चर्चा झाली. पण यावर तोडगा निघू शकला नाही.

अखेर आज (गुरुवारी) मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये पुन्हा चर्चा झाली पण यासाठी तडजोड करावी लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन जोशी यांची उमेदवारी मागे घेण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या 144 जागांच्या मागणीला चाप बसणार आहे. 2004च्या फॉर्म्युल्याप्रमाणे कदाचित 124 च्या आसपास जागा राष्ट्रवादीला काँग्रेस सोडू शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षानं आदेश दिल्यामुळे आपण उमेदवारी मागे घेतोय पण, निवडणूक लढलो असतो तर नक्की जिंकलो असतो, असं जोशी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close