S M L

बबनराव पाचपुतेंचा लवकरच राष्ट्रवादीला रामराम?

Sachin Salve | Updated On: Aug 14, 2014 09:34 PM IST

बबनराव पाचपुतेंचा लवकरच राष्ट्रवादीला रामराम?

pachapute14 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते हे सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यावर शिवीगाळ केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आपण जेव्हा याबद्दल अजित पवारांना सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते फोनवर आले नाहीत. त्यांचा फोन नेहमीच बंद असतो, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला.

भाजपबरोबरच मी अनेक पक्षांच्या संपर्कात आहे, असंही पाचपुतेंनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून पाचपुते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मात्र पाचुपतेंनी याला नकार दिला.

लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभा निवडणुकीतही पाचपुतेंना स्थान न मिळाल्यामुळे पाचपुते नाराज झाले. त्यामुळे पाचपुतेंनी आता बंड पुकारले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2014 09:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close