S M L

26/11 प्रकरणी पीएसआय कदम यांची साक्ष पुन्हा

11 मे, मुंबई 26/11 मुंबई हल्ला प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिस स्टेशनचे पीएसआय भास्कर कदम यांची बाकी राहिलेली साक्ष आज पुन्हा आर्थर रोडच्या विशेष कोर्टात नोंदवण्यात आली. या साक्षीदरम्यान कदम यांनी गिरगांव चौपाटीवर तुकाराम ओंबळेवर गोळ्या झाडणार्‍या अतिरेकी अजमल कसाब आणि अबु ईस्माइलचे कपडे आणि हत्यारं कोर्टात ओळखली. कसाब आणि ईस्माइलने हल्ल्यासाठी वापरलेल्या 2 एके 47 रायफल्स आणि 2 पिस्तुलं आज कोर्टासमोर सादर करण्यात आली. कसाब आणि ईस्माइलने वापरलेल्या पिस्तुलांपैकी एका पिस्तुलावर मेड इन पेशावर पाकिस्तान असा शिक्का आढळल्याचंही आज कोर्टात सरकारी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान हत्यारांची ओळख पटल्याचं पीएसआय कदम यांनी कोर्टाला सांगितल्यानंतर अजमल कसाब कोर्टात हसू लागला. त्यावर आक्षेप घेत कोर्टानं कसाबला फटकारलं आणि यापुढे अशा पध्दतीने कोर्टात हसल्यास कारवाईचा इशाराही दिला. 26/11 केसमध्ये मंगळवारी गिरगांव चौपटीवरील हल्ल्याशी संबंधित आणखी दोन साक्षीदार कोर्टासमोर आपली साक्ष देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2009 04:39 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close