S M L

नॅशनल पार्कमध्ये झाली प्रगणना : बिबट्या ठरला खरा हिरो

11 मे, मुंबई उदय जाधवउन्हाळ्याचा हंगाम साधून सध्या भारतातल्या जंगलांमध्ये प्राण्यांची गणती सुरू आहे. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्कमध्येही ही गणती झाली. बिबट्या हाच या नॅशनल पार्कचा खरा हिरो. या गणनेच्या वेळी पाणवठयावर आलेल्या बिबळ्याचं यावेळी दर्शन घडलं.प्राण्यांच्या शिरगणतीच्या निमित्तानं आयबीएन लोकमतनं बिबट्याच्या लाइव्ह दर्शनासाठी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये खास फिल्डींग लावली. जंगलाच्या या हिरोने थोडा वेळ का होईना हजेरी लावली. बिबट्याचे मिळालेले ठसे, आणि त्याने दाखवलेल्या हजेरीवरुन आता त्यांची जंगलातली संख्या लवकरच जाहीर केली जाईल. नॅशनल पार्कमधले वनरक्षक हर्शल साठ्ये यांना आणि त्यांच्या सहकार्यांना बिबट्याचे ठसे सापडले आहेत. प्रगणनेसाठी पुरावा म्हणून हे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मोल्ड करुन घेतले. ठश्याचा मोल्ड घेताना त्याची लांबी रुंदीही घेतली जाते. बिबट्याचा ठसा घेतल्यानंतर घेतलेला ठसा नर किंवा मादीचा आहे हे सुद्धा ओळखता येतं. नर बिबट्याच्या पायाचा ठसा चौकोनी असतो. तर मादीचा आयाताकृती असतो. 'यावर्षीच्या प्रगणनेमध्ये सापडलेले बिबट्यांचे ठसे तपासासाठी पुण्याच्या व्हिजन ऑफिसमध्ये पाठवण्यात येणार असून काही दिवसातंच बोरिवलीतल्या नॅशनल पार्कमध्ये नेमके किती बिबटे आहेत याची माहिती हाती लागेल', असं वनरक्षक हर्शल साठ्ये यांनी सांगितलं. मागच्या वर्षीच्या गणतीत नॅशनल पार्कमध्ये 22 बिबटे आढळले होते. आता यावर्षीचा रिपोर्ट आल्यावर त्यांच्या संख्येत वाढ झालीय की घट ते कळू शकेल. दरवर्षी बुद्ध पौर्णीमेला भारतातल्या सर्व जंगलांमध्ये अशी प्रगणना केली जाते. ती आवश्यकही आहे. प्राणी आणि जंगलं टिकली तर माणसंही टिकतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2009 04:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2009 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close