S M L

पुण्यात कचर्‍याचा प्रश्न चिघळला

12 मे, पुणेपुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या उद्दामपणामुळे पुण्यातलं कचरा आंदोलन पेटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उरळी देवाची या परिसरातल्या काचरा आंदोलनाचं खापर पुणे महानगर पालिकेवर फोडत परिसरातली कचर्‍याची समस्या कधी संपेल याविषयी मीडियाला काही सांगू इच्छित नाही, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे पुण्यातली कचर्‍याची समस्या आणि तिथल्या लोकांचं आंदोलन चिघळलं आहे. उरळी-देवाची या परिसरातल्या काचरा आंदोलनाचं खापर पुणे महानगर पालिकेवर फोडत परिसरातली कचर्‍याची समस्या कधी संपेल याविषयी मीडियाला काही सांगू इच्छित नाही, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं. पालकमंत्री अजित पवार यांचे बेताल वक्तव्य आणि मुजोर प्रशासन यामुळे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. आंदोलनाला 5 दिवस उलटूनही या प्रश्नावर फुरसुंगी आणि देवाची उरळी या गावकर्‍यांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे 19 वर्षांपासून सतावणारा पुणेकरांच्या कचर्‍याचा प्रश्न अधिकच उग्र बनत चालला आहे. या कचर्‍याचा त्रास तिथल्या लोकांना भोगावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत डम्पिंग ग्राऊंडला आग लागते. तर पावसाळ्यात कचरा कुजल्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या घशाखाली घास उतरत नाही. कचर्‍याच्या त्रासामुळे परिसरातल्या लोकांना डोळे, नाक, कान, घसा आणि त्वचेचे विकार होत आहेत. त्यामुळे फुरसुंगी आणि उरळी देवाची या परिसरातल्या नागरिकांनी डम्पिंग ग्राउन्ड हलवण्यासाठी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनचा आजचा सहावा दिवस आहे. उरळी-देवाची मधून कचरा डेपो हलवावा या मागणीवर गावकरी ठाम आहेत. डंपिंग ग्राउंडऐवजी प्रोसेसिंग प्लँट उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हाधिकार्‍यांसमोर ठेवला होता. पण गावकर्‍यांना हा प्रस्ताव मान्य नाही. उरळी-देवाची मधल्या कचरा डेपोला पर्यायी जागा शोधा, असं त्यांचं म्हणणं आहे. आजच्या बैठकीत चर्चा झालेल्या बाबींवर ग्रामसभेत निर्णय घेऊ, असं गावकर्‍यांनी सांगितलं आहे. याविषयी गावकर्‍यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सरकारनं दिलेली तीन महिन्याची मुदतही त्यांनी नाकारली आहे. पुण्याजवळ फुरसुंगी आणि देवाची उरळी इथल्या कचरा डेपोत येणार्‍या गाड्या परत पाठवून गावकर्‍यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. गेल्या महिन्यातच, या गावकर्‍यांनी कचरा डेपोच्या प्रश्नावरुन मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी कचर्‍याचा मोठा प्रश्न पुण्यात निर्माण झाला होता. पण तरीही प्रशासनाकडून कोणताही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुण्यात अशी कचर्‍याची समस्या असताानाही काही पुणेकरांनी मात्र त्यावर स्वत: पर्याय शोधला आहे. ज्योती मेहता नावाच्या एका महिलेने ओल्या कचर्‍यातून आपल्या टेरेसवर बाग फुलवली आहे. गेल्या 12 वर्षांपासुन त्या ही बाग संभाळत असुन हा कचरा खत म्हणुन वापरत आहेत. शेजारच्या हॉटेलमधून जमा होणारा कचरा त्या भाजीपाला निर्माण करण्यासाठी वापरत आहेत. जर पुण्यातील प्रत्येकाने असा प्रयत्न केला तर पुण्यातील कचर्‍याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता असल्याचं नाकारता येत नाही, अशीही आशा काही गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2009 09:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2009 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close