S M L

काँग्रेसला 174 जागा आणि सन्मानपूर्वक आघाडी हवी -पाटील

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2014 04:09 PM IST

89harshvardhan_patil15 ऑगस्ट : विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसने माघार घेतल्यामुळे आघाडीची तिढा सुटला. पण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला 174 जागा हव्या असून जी आघाडी होईल ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे असं सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मत व्यक्त केलं. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

येत्या 19 तारखेला आघाडीबाबतची अंतिम बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. तर येत्या 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला सुरुवात होणार असून जे कारखाने एफआरपीपेक्षा कमी दर देतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय.

तर कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक मार्ग काढला जाईल असं सांगत ज्यावेळी मुल्यांकन समितीचा अहवाल येईल त्यानंतरच याचा निर्णय होईल असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2014 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close