S M L

तिसर्‍या आघाडीसोबत जाण्याचा प्रश्न नाही - शरद पवार

12 मे, नवी दिल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्यातरी तिस-या आघाडीचा नाद सोडला आहे. आम्ही युपीएसोबतच आहोत आणि तिसर्‍या आघाडीत जाण्याचा सध्यातरी प्रश्न येत नाही, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कोणाशी युती करणार असल्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. आम्ही दोन राज्यांत काँग्रेससोबत आहोत, असं म्हणत पवारांनी काँग्रेसबरोबरच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवार यांची ही नवी भूमिका त्यांची कोणती राजकीय खेळी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण शरद पवार तिस-या आघाडी करणार असल्याच्या चर्चेने वेग पकडला होता. त्यात ते बीजेडीचे नेते आणि ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या भुवनेश्वरमधल्या प्रचारसभेला जाणार होते. पण विमान बिघडल्याचं तांत्रिक कारण पुढे दाखवून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना त्या सभेला पाठवलं होतं. त्यानंतर तिसरी आघाडी होणार की नाही यावर भरपूर चर्चा रंगल्या होत्या. हल्लीच राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही दुस-या पक्षांशी युती करू असं विधान केलं होतं. पण आता शरद पवार यांनी तिसर्‍या आघाडीत जाण्याचा सध्यातरी प्रश्न येत नाही, असं स्पष्ट करून निवडणुकीनंतर पवार कोणाशी युती करणार असल्याचं राष्ट्रवादीचं मौन सुटलं आहे. पण शरद पवार यांनी केलेल्या विधानावर शंका व्यक्त केली जात आहे. कारण हे विधान म्हणजे पवारांच्या पंतप्रधानपदासाठीची नवी चाल तर नाही ना, असं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे. पण असं असलं तरी युपीएच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसने मनमोहन सिंग यांचं नाव आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पीएम पदासाठीची भूमिका निवडणुकीच्यानंतर कळू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2009 02:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2009 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close