S M L

मोदींच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या 'INS कोलकाता'चे राष्ट्रार्पण

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2014 05:46 PM IST

मोदींच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या 'INS कोलकाता'चे राष्ट्रार्पण

16 ऑगस्ट : देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. एकाचवेळी 16 क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेल्या INS कोलकाताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

मोदी आज एकदिवशीय महाराष्ट्र दौर्‍यावर आहे. मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाताचं राष्ट्रार्पण करण्यात आलं. भारतात बनलेली ही सर्वात मोठी युद्धनौका आहे. या युद्धनौकेच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयएनएस कोलकाताचं आधी 2010 साली लोकार्पण होणार होतं, पण अनेक कारणांमुळे ते रखडलं.

आयएनएस कोलकाताचं वजन एकून 6,800 टन इतक असून माझगाव डॉक्स लिमिटेडनं ही युद्धनौका बांधलीय. ही युद्धनौका प्रकल्प 15 या अल्फा साखळीतील आहे. एकाच वेळी 16 ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेली भारताची पहिलीच ही युद्धनौका आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close