S M L

जेएनपीटी सेझ प्रकल्पांमध्ये भूमिपूत्रांना प्राधान्य -मोदी

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2014 05:20 PM IST

जेएनपीटी सेझ प्रकल्पांमध्ये भूमिपूत्रांना प्राधान्य -मोदी

modi in jnpt16 ऑगस्ट : आयएनएस कोलकाताचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उरणमध्ये जेएनपीटीमध्ये बंदर जोडणी प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी जेएनपीटी सेझमधून निर्माण होणार्‍या रोजगार आणि जहाज बांधणी प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं.

तसंच जगात ज्या ज्या देशांचा विकास झालाय त्यात त्या देशांच्या बंदरांचा विकास झालाय त्यांचंच महत्व वाढलं, सागरी दळणवळण आणि त्याचा विकास ही महत्वाची बाब आहे, विकासामध्ये बंदरांची भूमिका महत्त्वाची आहे असंही यावेळी मोदी म्हणाले.

आपण छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो हे मी माझ्या भाग्य समजतो असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि शिवरायांचा जयघोष करत भाषणाची सांगत केली.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अंतर्गत न्हावाशेवा येथे हा नवा सेझ प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प सुमारे 277 हेक्टर जमिनीवर उभा राहणारा असून 2018 सालापर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या सेझद्वारे 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. या सेझसाठी 4000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा संपूर्ण प्रकरल्प सरकारी आणि खासगी भागीदारीतून उभा राहणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2014 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close