S M L

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2014 07:26 PM IST

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

17 ऑगस्ट :  जम्मू-काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमधल्या आर्नियामध्ये बीएसएफच्या 2 पोस्टवर पाकिस्तानी सैन्याने आज (रविवारी) पहाटे पुन्हा जोरदार गोळीबार केला. त्यानंतर भारताकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आलं. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अजूनही दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरू आहे.

दरम्यान, गेल्या 10 दिवसांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. शनिवारी श्रीनगरजवळ बीएसएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close