S M L

विधानसभेच्या तोंडावर राज्यात श्रेयाचे राजकारण सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2014 06:21 PM IST

विधानसभेच्या तोंडावर राज्यात श्रेयाचे राजकारण सुरू

17 ऑगस्ट :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी थाटामाटात सोलापुरमधील पॉवरग्रीड राष्ट्राला लोकार्पण केले असलं तरी तीन वर्षांपूर्वीच तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्तेही याच पॉवरग्रीड प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राज्यात श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे.

21 ऑगस्ट 2011 रोजी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लिंबीचिंचोळीतील पॉवरग्रीड प्रकल्प राष्ट्राला लोकार्पण केलं होतं. या प्रकल्पातून गेल्या 3 वर्षांपासून कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत वीज पुरवली जात आहे. मात्र आता तीन वर्षांनी याच प्रकल्पाचे पुन्हा एकदा राष्ट्रार्पण करण्यात आलं. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. एकच प्रकल्प दोन वेळा उद्घाटन झाल्याची चर्चा सोलापूरमध्ये रंगली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी पुणे, सोलापूर, हैदराबाद आणि सोलापूर ते येड या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळवून दिली होती. या प्रकल्पाचेही मोदींच्या हस्तेच लोकार्पण झाले.

विशेष म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे युतीच्या काळात मंजूर करण्यात आला पण त्याचे श्रेय काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार घेते अशी टीका करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close