S M L

ब्ल्यू प्रिंट कधी आणायची हे मी ठरवणार - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2014 08:21 PM IST

109raj_on_modi

17 ऑगस्ट :  मीडिया आणि सोशल मीडियामध्ये मनसेच्या ब्ल्यू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्या निराधार असून त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्ल्यू प्रिंट कधी येणार, हे मी सांगेन, असं स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात दिलं. हल्लीचे मीडियावाले वॉट्स ऍपवरून बातम्या करतात, अशी टीकाही त्यांनी केली.

ठाण्यात मिक्टा 2014 या मराठी आंतरराष्ट्रीय नाट्य आणि चित्रपट महोत्सवाचं रविवारी राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ब्ल्यू प्रिंटच्या प्रकाशनाला रतन टाटा, मुकेश अंबानी येतील हे मलादेखील माहीत नव्हते, असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. आमची ब्ल्यू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेनच, असं त्यांनी नमूद केलं. सोशल मीडिया हे माध्यम प्रभावी असलं तरी ते आता डोकेदुखी ठरू लागलं आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल मीडियापासून थोडं लांब राहायला हवं, असं त्यांनी सांगितलं.

राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडू, असं राज ठाकरे गेल्या पाच वर्षांपासून सांगत आहेत. मात्र अजूनही ही बहुप्रतीक्षित ब्लू प्रिंट आलेली नाही. यावरून राज ठाकरेंवर वारंवार टीका होत आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close