S M L

पहिल्याचं दिवशी 'सिंघम रिटर्न्स'ची 32.09 कोटी रुपयांची कमाई

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2014 08:31 PM IST

 पहिल्याचं दिवशी 'सिंघम रिटर्न्स'ची 32.09 कोटी रुपयांची कमाई

17 ऑगस्ट : अजय देवगणच्या 'सिंघम रिटर्न्स'नी सलमान खानला चांगलीच 'किक' दिली असून पहिल्याच दिवशी सिंघम रिटर्न्सनी तब्बल 32.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत सिंघम रिटर्न्स तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. सलमानच्या 'किक' चित्रपटानं पहिल्या दिवशी 24.40 कोटी रुपयांची कमाई केली होती.

पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत आमिर खानच्या धूम 3 चा पहिला नंबर लागतो. 'धूम 3' ने पहिल्या दिवशी तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याखालोखाल शाहरूख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'चा क्रमांक लागतो. 'चेन्नई एक्स्प्रेस'ने 33.4 कोटींची कमाई केली होती. सलमान खानच्या 'एक था टायगर'चा या यादीत तिसरा क्रमांक होता. तर सलमान खानचा 'एक था टायगर' या सिनेमाने 32.95 कोटी रुपयांची कमाई करत यादीत तिसरा क्रमांक पटकावला असून त्यापाठोपाठ सलमानच्याचं किकचा नंबर लागला होता. मात्र सलमानच्या किकची जागा आता मराठमोळ्या सिंघमने घेतली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्सने पहिल्याच दिवशी सुमारे 32.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सलमानचा किक हा चित्रपटही गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या 24.40 कोटी रुपयांची कमाई केली असून आत्तापर्यंत या चित्रपटाने तब्बल 372. 50 कोटींची कमाई करून रेकॉर्ड केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close