S M L

काँग्रेसचं हे वागणं बरोबर नाही - अजित पवार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2014 08:21 PM IST

ajit paawar

17 ऑगस्ट :  आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा झालेली नसतानाही काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या काही जागांवर दावा केला जात आहे. काँग्रेसचे हे वागणं बरं नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

रविवारी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी काँग्रेसला हा टोला लगावला आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. राज्यात 15 ते 17 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी सूचनाही त्यांनी या मेळाव्यात केली.

मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे नॅशनल हायवे ऍथोरिटीनं 20 ऑगस्टपर्यंत बुजवले नाहीत तर हे खड्डे राज्य सरकार बुजवेल आणि त्याचं बिल केंद्र सरकारला पाठवेल असं सांगत अजित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना यासंदर्भात पत्र पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. सिंचन घोटाळ्यासंदर्भात माधव चितळे समितीच्या अहवालातील 22 पैकी 20 शिफारसी स्वीकारल्या आहेत. सिंचन घोटाळ्यात आमच्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2014 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close