S M L

थरांचा थरार अन् अवघी मुंबापुरी गोविंदामय

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2014 03:10 PM IST

थरांचा थरार अन् अवघी मुंबापुरी गोविंदामय

Web_Govinda copy

18 ऑगस्ट :  बोल बजरंग बली की जय! असे म्हणत ढाक्कुमाक्कुमच्या तालावर ठेका धरण्याच्या प्रतीक्षेत असलेली मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथके आता थरांचा थरथराट घडवून हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. रविवारी रात्रीपासूनच, कृष्णजन्मानंतर हंड्या फोडण्यास सुरुवात झाली.

मुंबईमध्ये काल रात्रीपासून दहिहंडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी हंड्या लावलेल्या पहायला मिळत होत्या. मुंबईत सकाळी लवकर हंडी फोडण्याचा मान जातो तो दादरच्या आयडियल गल्लीतल्या हंडीला. या ठिकाणच्या तीनही हंड्या दरवर्षी बाराच्या आधी फुटतात असा नेम आहे. ठाण्यातही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं. ठाण्यात रविवारीच दहीकाला उत्सवाला सुरवात झाली. शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने मराठी कलाकारांनी दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात केली. संकल्प चौकातली हंडी फोडण्याचा मान यंदा अभिनेत्री धनश्री काडगावकरहीला मिळाला. उत्सवाची सुरुवात शिवसेनेचे ठाणे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून केली.

यंदा सुप्रीम कार्टाने बालगोविंदांच्या वयाची अट 18 ऐवजी 12वर्षांपर्यंत कमी केली आहे मात्र उंचीवरती काहीचं मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे यंदातरी उंच थरांची स्पर्धा रंगलेली पाहायला मिळणार आहे. ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, मुंबई आणि उपनगरांतील प्रत्येक गल्लीत दहीकाला उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. दहीहंडीच्या टी-शर्ट्सचे वाटप, ट्रक- टेम्पोंची गर्दी, गोविंदांचा नाश्ता-जेवणाची सोय या सगळ्याची व्यवस्था करण्यात गोविंदा पथकांची तारांबळ उडाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close