S M L

भिवंडीत नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2014 10:32 AM IST

rape sds

18 ऑगस्ट :  पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासोबत आठ दिवसांपूर्वीच भिवंडीत आलेल्या नवविवाहितेवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 19 वर्षांच्या नवविवाहितेवर तिच्या घरात घुसून रविवारी मध्यरात्री या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

पीडितेच्या घराच्या छताचे पत्रे काढून तिघे जण घरात घुसलेआणि नवर्‍याला मारहाण करून त्याच्यासमोरच पत्नीवर बलात्कार केला. महिलेच्या पतीने आरडाओरड केली पण या नराधामांनी शेजार्‍यांच्या घराला बाहेरून कड्या लावल्यानं मदत मिळू शकली नाही. एवढचं नाहीतर या दाम्पत्याची सोन्याची चेन आणि मंगळसूत्र सुद्धा नराधमांनी पळवलं आहे. दरम्यान काल रात्री पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात असून 3 संशयितांना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भिवंडीत गेल्या 15 दिवसांत चोरीच्या सुमारे 16 घटना घडल्या आहेत आणि या बलात्कारानं भिवडीतल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2014 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close