S M L

आरोपी मनोहर कदम हे व्यवस्थेचे बळी - एस. एस. विर्क

12 मे, मुंबई रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणातले आरोपी मनोहर कदम हे व्यवस्थेचे बळी असल्याचं धक्कादायक विधान पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांनी केलं आहे. मनोहर कदम यांना आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. विर्क यांनी मनोहर कदमला सहानुभूती दिल्यामुळे आता नवा वाद पुढे येणार असल्याचं दिसत आहे. हे विधान वादग्रस्त असल्याचं लक्षात आल्यावर विर्क यांनी रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरणाबाबतचं आपलं बोलणं आवरतं घेतलं. आरपीआय नेते रामदास आठवले यांनी एस.एस.विर्क यांच्या विधानांवर आक्षेप घेतला आहे. कोर्टाने निकाल दिलेल्या प्रकरणात पोलीस अधिकार्‍याने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी सांगितलं. राज्याचे पोलीस महासंचालक विर्क यांनी रमाबाई आंबेडकर गोळीबार प्रकरणातला आरोपी मनोहर कदमसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा या केसवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2009 05:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2009 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close