S M L

भारत, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांची श्रीलंकेला मदत

12 मे, कोलंबोलिट्टेविरुद्धच्या कारवाईत भारत, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र श्रीलंकेच्या सरकारला मदत करत आहेत, असा आरोप लिट्टेचा राजकीय प्रमुख बी. नादेसन यानं केला आहे. नो फायर झोनमधल्या निर्वासितांसाठी विमानातून जीवनावश्यक वस्तू टाकाव्यात, असं आवाहन त्यानं केलं आहे. तामिळी लोकांना ज्याठिकाणी ठेवण्यात आलंय, अशी ठिकाणं श्रीलंका सरकारनं जगासाठी खुली करावीत, असं आवाहनही त्यानं केलं आहे. दरम्यान, लिट्टेविरोधतली कारवाई थांबावी, यासाठी जगभरातले तामिळ निदर्शनं करत आहेत. कॅनडामध्ये निदर्शकांनी काही तास वाहनं अडवून धरली. तर लंडनमध्ये पार्लमेंट जवळचे रस्ते बंद करणार्‍या निदर्शकांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंकेतल्या पूर्व भागात रक्तपात सुरू आहे, असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलंय. गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी 378 लोकांचा बळी गेला आहे. त्यात 100 लहान मुलांचा समावेश आहे. तर एक हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे. लिट्टे त्यांच्या ताब्यात असलेल्या लोकांचा ढालीसारखा वापर करतंय. पण श्रीलंका सरकारही लोकांना वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नसल्याचा आरोप या प्रवक्त्यानं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2009 05:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2009 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close