S M L

मुंबईकरांवर पुन्हा दोन दिवस पाणीकपातीचे संकट

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2014 10:42 AM IST

water shortage rap

19 ऑगस्ट :  जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणीकपातीतून सुटका होत नाही तोच मुंबईकरांना पुन्हा दोन दिवस 25 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेल्या तानसा तलावाची पाईपलाईन फुटल्याने ही पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातील वर्तकनगर इथे काल (सोमवारी) दुपारी 2 च्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे मुंबई शहरात 25 टक्के आणि पूर्व-पश्चिम उपनगरांत 10 पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close