S M L

पंकजा मुंडेंची राज्यात संघर्ष यात्रा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2014 11:04 AM IST

पंकजा मुंडेंची राज्यात संघर्ष यात्रा

19 ऑगस्ट :  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राज्यभरात फिरून जी यात्रा काढणार होते ती संघर्ष यात्रा आता त्यांची मुलगी पंकजा मुंडे काढणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आणि दोन टप्प्यांत पार पडणार्‍या या यात्रेला अखेर हिरवा कंदील दाखवला असून या यात्रेत राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख नेतेही सहभागी होणार आहेत. ही यात्रा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधून 79 विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क साधत पुढे जाईल. यात्रेत सहाशेहून अधिक गावांना भेट देण्याची योजना आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 1994-95 मध्ये विधानसभा निवडणुकीपूवच् ऐतिहासिक संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले होते. या यात्रेमुळे तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधी वातावरण तयार होऊन त्याचा फायदा युतीला झाला होता. आता हाच फॉर्म्युला त्यांची कन्या पंकजा पालवे मुंडे यांनी पुन्हा एकदा वापरण्याचे ठरवले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close