S M L

रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे 'बॉस'!

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2014 04:25 PM IST

 रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे 'बॉस'!

19 ऑगस्ट : इंग्लंडविरोधात लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीममध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता भारतीय वन डे क्रिकेट टीमच्या संचालकपदी रवी शास्त्रींची निवड करण्यात आली आहेत. तसंच टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांच्या समर्थक स्टाफला सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. तर बॉलिंगचे कोच जो डॉवेस आणि फिल्डिंग कोच ट्रेवर पेन्नी यांना सक्तीची रजा देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संजय बांगर आणि भारत अरुण यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्यातरी फ्लेचर टीम इंडियाच्या कोचपदी कायम राहणार आहेत. पण रवी शास्त्रींकडे क्रिकेट टीमची संपूर्ण जबाबदारी देऊन फ्लेचर यांना धक्का देण्यात आला आहे. ऐतिहासिक लॉर्डस्‌च्या मैदानावर टीम इंडियाचा दारूण पराभव झाल्यानंतर भारताची साडेसाती काही सुटलीच नाही. इंग्लंड विरूद्ध झालेल्या टेस्ट मॅच्या मालिकेमध्ये भारत 1-3 असा पराभव झाला त्यामुळे बीसीसीआयने बदलाचा निर्णय घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close