S M L

राष्ट्रवादीचे माजी आ.प्रताप पाटील-चिखलीकर शिवसेनेत

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2014 05:41 PM IST

राष्ट्रवादीचे माजी आ.प्रताप पाटील-चिखलीकर शिवसेनेत

cikhalikar19 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीचे वार्‍यांचा वेध घेत पक्षांतराचा नारळ फुटला आहे. आज (मंगळवारी) राष्ट्रवादी माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.

लोहा मतदारसंघासाठी चिखलीकर इच्छुक आहेत. पण या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. चिखलीकरांनी 8 ऑगस्टलाच पक्षांतरांचे संकेत दिले होते.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. लोहा विधानसभा मतदार संघासाठी चिखलीकर इच्छुक आहेत.

पण याच मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शंकर अण्णा धोंडगे हे प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने चिखलीकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय.

प्रतापसिंह मोहिते पाटलांचे सुपूत्र सेनेच्या वाटेवर

दुसरीकडे अकलूजचे नेते आणि माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा धवलसिंह मोहिते पाटील हेसुद्धा आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचे काका विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत असून त्यांनी माढा मतदारसंघ जिंकून दाखवला. मात्र आता त्यांच्या घरातच विरोधी भूमिका घेत पुतण्या धवलसिंह मोहिते पाटील शिवसेनेत दाखल होत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि नंदुरबारचे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष विक्रांत मोरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय.

प्रताप पाटील चिखलीकरांची राजकीय वाटचाल

- गेली 25 वर्षं सक्रीय राजकारणात

- चिखलीचे सरपंच ते आमदार असा प्रवास

- युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष

- 2004 : काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात

- 2004 : अपक्ष म्हणून विजयी

- 2009 : लोहा मतदरासंघातून अपक्ष म्हणून पराभूत

- विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत प्रवेश

- ऑगस्ट 2014 : राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याची तयारी

- अशोक चव्हाणांचे विरोधक आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे समर्थक

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close