S M L

उरळी-फुरसुंगीच्या गावकर्‍यांनी सुचवला कचर्‍यावर तोडगा

13 मे, पुणे डंपिंग ग्राऊन्डवर कव्हर घालण्याचा मागणीवजा तोडगा उरळी देवाची आणि फुरसुंगी गावतल्या गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना सुचवला आहे. तसंच उरळी देवाची आणि फुरसुंगी गावतला 'कचरा कोंडी'च्या प्रश्नाचा सातव्या दिवशीही तड लागत नाही हे पाहता गावकर्‍यांनी कचरा प्रश्नाचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबतचा ठराव गावकर्‍यांनी ग्रामसभेत घेतला आणि तशा ठरावाचं निवेदन गावकर्‍यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी गावच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलं आहे. त्या निवेदनात गावकर्‍यांनी डंपिंग ग्राऊन्डवर कव्हर घालण्याची मागणी केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून सतावणारा पुणेकरांच्या खास करून उरळी देवाची आणि फुरसुंगी गावतला कचर्‍याचा प्रश्न अधिकच उग्र बनत चालला आहे. या कचर्‍याचा त्रास तिथल्या लोकांना भोगावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत डंपिंग ग्राऊंडला आग लागते. तर पावसाळ्यात कचरा कुजल्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या घशाखाली घास उतरत नाही. कचर्‍याच्या त्रासामुळे परिसरातल्या लोकांना डोळे, नाक, कान, घसा आणि त्वचेचे विकार होतात. त्यामुळे फुरसुंगी आणि उरळी देवाची या परिसरातल्या नागरिकांनी डंपिंग ग्राउन्ड हलवण्यासाठी आंदोलन छेडलं. या आंदोलनचा आजचा सातवा दिवस आहे. उरळी-देवाची मधून कचरा डेपो हलवावा या मागणीवर गावकरी ठाम आहेत. डंपिंग ग्राउंडऐवजी प्रोसेसिंग प्लँट उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हाधिकार्‍यांसमोर ठेवला होता. पण गावकर्‍यांना हा प्रस्ताव मान्य नाही. उरळी-देवाची मधल्या कचरा डेपोला पर्यायी जागा शोधा, असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामसभेच्या बैठकीत चर्चा झालेल्या बाबींवर ग्रामसभेत निर्णय घेऊ, अशी माहिती गावकर्‍यांनी आयबीएन-लोकमतला दिली होती. __PAGEBREAK__त्याप्रमाणे काल उरळी-फुरसुंगीच्या गावकर्‍यांची ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेत त्यांनी, डंपिंग ग्राऊंडवर प्लास्टिक आणि काँक्रिटच्या मिश्रणाचं पूर्ण कव्हरिंग करावं आणि तिथं पुन्हा कचरा टाकण्यात येऊ नये, असा ठराव एकमतानं मंजूर झाला. त्याप्रमाणे गावक-यांनी जिल्हाधिका-यांकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. तसंच डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर प्रशासन तोडगा काढणार असेल तरच चर्चेला येऊ या भूमिकेवर गावकरी ठाम आहेत. डंपिंग ग्राऊंड गावातून हटवा, अशी मागणी करत गावकर्‍यांनी हे आंदोलन परत सुरू केलं होतं. उरळी देवाची या परिसरातल्या काचरा आंदोलनाचं खापर पुणे महानगर पालिकेवर फोडत परिसरातली कचर्‍याची समस्या कधी संपेल याविषयी मीडियाला काही सांगू इच्छित नाही, असं उत्तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे पुण्यातली कचर्‍याची समस्या आणि तिथल्या लोकांचं आंदोलन चिघळण्याचे संकेत मिळाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2009 12:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close