S M L

आम्ही दोघी बहिणी निवडणूक लढवणार -पंकजा मुंडे

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2014 05:40 PM IST

आम्ही दोघी बहिणी निवडणूक लढवणार -पंकजा मुंडे

 

19 ऑगस्ट : आपण केंद्रात मंत्रिपदाबद्दल अजून कोणतीही मागणी केलेली नाही पण विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघी बहिणी उतरणार हे खरं आहे अशी स्पष्टोक्ती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. पंकजा मुंडे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केलाय.

आपण केंद्रात जाणार की राज्यात राहणार याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आपण स्वत:ला मानत नाही. आता जी संघर्ष यात्रा काढणार आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी मुळीच नाही. आपल्याला फक्त गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करायचंय त्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे असंही पंकजा यांनी स्पष्ट केलं.

तसंच मला मुख्यमंत्रीपदापेक्षा सत्तापरिवर्तन झालं यात मी माझा वाटा किती उचलला हे सिद्ध करायचंय आणि हीच माझ्या बाबांना मोठी श्रद्धाजंली असणार आहे असंही पंकजा म्हणाल्या. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनी पंकजांना गोपीनाथ मुंडे यांच्या जागी मंत्रिपद द्यावे अशी मागणी केलीये.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे बीडमध्ये मुंडे कुटुंबीयांची जागा निश्चित मानली जात आहे. त्यामुळे मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या लोकसभेची निवडणूक लढवणार तर डॉ.प्रीतम खाडे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. याला खुद्द पंकजा मुंडे यांनी आता दुजोरा दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 08:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close