S M L

राष्ट्रवादीच्या वाट्याला 130 ते 135 जागा?

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2014 05:40 PM IST

35pawar_cm_ncp19 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निश्चित केलीय. जागांचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते ए. के. अँटोनी यांची आजची बैठक पुढे ढकलण्यात आलीय.

दरम्यान, राष्ट्रवादीने निम्या-निम्या म्हणजे 144 जागांचा आग्रह सोडण्याची तयारी दाखवलीय. पण काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचं राष्ट्रवादीने काँग्रेसकडे स्पष्ट केलंय.

त्यामुळे दिल्लीच्या बैठकीत 130 ते 135 जागांच्या आसपास जागा सोडवून घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असेल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

जागावाटपाचा तिढा !

- राष्ट्रवादीची 144 जागांचा आग्रह सोडण्याची तयारी

- पण 124 जागांचा काँग्रेसचा प्रस्ताव मात्र राष्ट्रवादीला अमान्य

- 130 ते 135 जागा सोडवून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

- काँग्रेसला राष्ट्रवादीकडून बंडखोरांना आवरण्याची हवी हमी

- 12 जागांची अदलाबदल शक्य

- काही अपक्षांना चिन्हांवर लढवणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2014 11:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close