S M L

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणार नाही -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2014 05:36 PM IST

cm on modi20 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाच व्यासपीठावर आल्यामुळे सोलापुरात घडलेल्या प्रकारमुळे बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. नागपूरमध्ये उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्‍या मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्कार टाकलाय.

मुख्यमंत्री उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत, ही बातमी सर्वात पहिल्यांदा आयबीएन-लोकमतनं दिली होती ती खरी ठरलीय. मुख्यमंत्र्यांऐवजी शिष्टाचार म्हणून सरकारचा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधानांसोबतच्या काही कार्यक्रमांत घडलेल्या घटनांमुळे सांघिक भावनेला तडा गेलाय. पंतप्रधानपदी कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी ते देशाचे पंतप्रधान आहे त्याचा आम्ही आदर राखतो. या अगोदरच्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो होतो पण आता राज्य सरकारकडून प्रतिनिधी पाठवला जाईल पण आपण या कार्यक्रमाला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करून टाकलं.

16 ऑगस्टला सोलापूरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान मोदींच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. असाच प्रकार मंगळवारी हरियाणामध्येही घडला होता. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमाला न राहण्याची भूमिका घेतलीय. पृथ्वीराज चव्हाण यांनीही असाच निर्णय घेतलाय. नागपूर आणि पुणे मेट्रोमध्ये केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोपही या अगोदर मुख्यमंत्र्यांनी केला होता. दुसरीकडे नागपूर मेट्रोला आजच केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2014 09:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close